For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘उज्ज्वला’ लाभार्थ्यांना अतिरिक्त सवलती?

06:12 AM Nov 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘उज्ज्वला’ लाभार्थ्यांना अतिरिक्त सवलती
Advertisement

केंद्र सरकारकडून प्रयत्न : लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकार पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना आणखी दिलासा देण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसात एलपीजी गॅस सिलिंडरवर आणखी सूट मिळण्याचे संकेत वर्तवले जात आहेत. पुढील वषी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. सध्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 एलपीजी गॅस सिलिंडरवर 300 रुपये सबसिडी मिळते. मात्र, नजिकच्या काळात येत्या काही महिन्यात उज्ज्वला योजनेंतर्गत अतिरिक्त सवलती देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

Advertisement

केंद्र सरकार सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरचे दर 100 रुपयांनी कमी करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र, सर्वच घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना सबसिडी दिली जात नसल्यामुळे अजूनही ग्राहकांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्याच्यादृष्टीनेही केंद्राकडून विचार केला जात आहे. 2020 च्या प्रारंभी कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून सर्वसामान्य गॅस सिलिंडर ग्राहकांची सबसिडी बंद करण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने काही राज्ये किंवा उज्ज्वला लाभार्थ्यांना सध्या सबसिडी दिली जात असली तरी अजूनही कित्येक ग्राहक अनुदानापासून वंचित आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 4 ऑक्टोबर रोजी 9.5 कोटी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 100 रुपये अनुदान मंजूर केले होते. याआधी सप्टेंबरमध्ये सरकारने देशभरातील सर्व सामान्य ग्राहकांसाठी एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मंजूर केली होती. सध्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी एका एलपीजी गॅस सिलिंडरसाठी 600 ते 620 रुपये मोजतात, तर इतर सरासरी ग्राहकांना एका एलपीजी गॅस सिलिंडरसाठी 900 ते 920 रुपये द्यावे लागतात.

Advertisement
Tags :

.