For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-सौंदत्ती मार्गावर अतिरिक्त बसेस

10:53 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव सौंदत्ती मार्गावर अतिरिक्त बसेस
Advertisement

नवरात्रोत्सवात जोतिबा दर्शनासाठीही विशेष व्यवस्था

Advertisement

बेळगाव : भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव-सौंदत्ती व बेळगाव-जोतिबा (जि. कोल्हापूर) मार्गावर जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त देवदेवतांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. यासाठी परिवहनने ही अतिरिक्त बस सुविधा उपलब्ध केली आहे. गतवर्षीपासून शक्ती योजना सुरू झाली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सौंदत्ती यल्लम्मा देवीचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भक्तांसाठीही यात्रा विशेष या नावाने तब्बल 53 अतिरिक्त बस सोडल्या जात आहेत. दि. 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान या विशेष बस सौंदत्ती आणि जोतिबा मार्गावर धावणार आहेत. बेळगाव, खानापूर, चंदगड यासह इतर भागातून सौंदत्ती यल्लम्मा डोंगराकडे दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. नवरात्रोत्सवात देवदेवतांचे दर्शन घेतले जाते. दरम्यान याकाळात सौंदत्ती मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असते. यासाठी अतिरिक्त बसेसची सोय करण्यात आली आहे. शक्ती योजनेंतर्गत महिलांना मोफत प्रवास या मार्गावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या मार्गावर बसेसमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.