महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अंगणवाड्यांनाच एलकेजी-युकेजी वर्ग जोडा

11:12 AM Jun 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्य अंगणवाडी नोकर संघाची मागणी 

Advertisement

बेळगाव : प्राथमिक शाळेला एलकेजी व युकेजी वर्ग जोडण्याऐवजी अंगणवाडी केंद्रांतून एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करा, अशी मागणी कर्नाटक राज्य अंगणवाडी नोकर संघाने (सीआयटीयू) केली आहे. याबाबतचे निवेदन महिला व बाल कल्याण खात्याच्या कार्यक्रम अधिकारी रेवती होसमठ यांच्याकडे देण्यात आले. शासनाचा आदेश धुडकावून प्राथमिक शाळेत एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र या प्रकारामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस अडचणीत येणार आहेत. जिल्ह्यात 5,331 अंगणवाडी केंद्रे आहेत. यामध्ये सेविका आणि मदतनीसांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे अंगणवाडीलाच युकेजी-एलकेजी वर्ग सुरू करावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्षा मंदा नेवगी, मिनाक्षी झपडे, उल्का सुळेभावी, भारती पाटील आदी उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article