तेलगू चित्रपटात दिसणार आदर्श
सुपरबॉयज ऑफ मालेगाव या चित्रपटात आदर्श गौरव हा मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट फ्लॉप ठरल्याने आदर्श गौरवला धक्का बसल्याचे मानले जाते. बॉलिवूडमध्ये फारसे यश न मिळाल्याने त्याची कारकीर्द अडचणीत आली आहे. यापूर्वी त्याचा पहिला चित्रपट ‘मॉम’ हा 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु आदर्श आता दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळला आहे.
आदर्श हा बॉलिवूडमधील गुणवान अभिनेता म्हणून ओळखला जातो. परंतु त्याचे मागील काही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. याचमुळे आदर्शने आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:चे नशीब आजमाविण्याचा निर्णय घेतला आहे. आदर्श सध्या हैदराबादमध्ये स्वत:च्या नव्या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे.
डी.व्ही.व्ही. दानय्या यांची कन्या जान्हवीच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत असल्याचे समजते. हा चित्रपट
माझ्यासाठी अत्यंत खास आहे. तेलगू माझी मातृभाषा आहे, परंतु आतापर्यंत या भाषेत मला स्वत:ची कला दाखवून देण्याची संधी मिळाली नव्हती. तेलगू चित्रपटांवर अत्यंत प्रेम करणाऱ्या परिवारातून मी येतो. याचमुळे हा अनुभव माझ्यासाठी घरवापसीसारखा आहे. या चित्रपटाशी जोडले गेलेले लोक वास्तविक आणि प्रभावशाली कहाण्या सादर करण्यावर विश्वास ठेवतात. त्यांची कहाणी निवडण्याची प्रक्रिया अत्यंत वेगण आणि अनोखी असल्याचे आदर्शने म्हटले आहे.