आदर्श शिक्षिका प्रा. सुषमा मांजरेकर यांचा सन्मान
पेंडूर- सातवायंगणी येथील दिपावली शो टाईम कार्यक्रमाचे औचित्य
न्हावेली / वार्ताहर
पेंडूर सातवायंगणी येथील ओंकार कला क्रिडा मंडळातर्फे दिपावली शो टाईम कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्याविहार इंग्लिश व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा.सौ.सुषमा प्रवीण मांजरेकर यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.मातोंडच्या नवनिर्वाचित सरपंच सौ.मयूरी वडाचेपाटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपसभापती बाळू परब,ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब,पेंडूर माजी सरपंच गिताजंली कांबळी,देवा कांबळी,मंडळांचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य नीलेश वैद्य,तरुण भारतचे उपसंपादक प्रवीण मांजरेकर,महेंद्र मांतोडकर,नाट्यकर्मी सौ. गिताजंली मांतोडकर,उत्तम वैद्य,सत्यवान वैद्य,प्रा. ग्रामपंचायत सदस्या कु.हर्जी,महेश वडाचेपाटकर,आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी सौ.मांजरेकर यांनी सत्काराबद्दल ऋण व्यक्त करुन मंडळाच्या एकोप्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी तर आभार नीलेश वैद्य यांनी मानले.