महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आदर्श शिक्षक ठरला ‘कमिशन एजंट’

12:57 PM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिक्षक योगेश सिनाय कुंकळकर गजाआड : तब्बल रु. 1.25 कोटींना गंडवल्याचे प्रकरण,ढवळीतील प्रतिष्ठित हायस्कूलमधील शिक्षक 

Advertisement

फोंडा : बेरोजगारांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून 1.25 कोटी ऊपयांना गंडविल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी ढवळी-फोंडा येथील एका प्रतिष्ठित हायस्कूलच्या शिक्षकाला अटक केली आहे. योगेश य. सिनाय कुंकळीकर (49, रा. ढवळी, भगवती मंदिराजवळ) असे त्याचे नाव आहे. ठकसेन शिक्षक योगेश याची 3 दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांना आदर्श ठरलेल्या या ‘सरस्वतीपुत्र’ने अतिपैशाच्या हव्यासापोटी शिक्षकी पेशाला डाग लावण्याचे लाजिरवाणे कृत्य केल्यामुळे विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांचे पालकही व्यथित झाले आहेत. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोकरी घोटाळ्यात मध्यस्थ म्हणून वावरणारा योगेश या शिक्षकाने आपण गोत्यात येणार नाही यासाठी सर्व शर्थीचे प्रयत्न करून थकल्यानंतर तो आपण हे दुष्कृत्य केल्याचे सांगण्यासाठी फोंडा पोलिस स्थानकात दाखल झाला होता. आपल्याविरोधात नागेशी येथील संगम बांदोडकर यांनी 12.5 लाख ऊपयांना गंडविल्याची फोंडा पोलिसस्थानकात तक्रार केल्याचा सुगावा लागल्यामुळे पोलिसांकडून सहानुभुती मिळवण्यासाठी किंवा या घटनेत आपल्याला सॉफ्ट कॉर्नर मिळवून घेण्यासाठी योगेश पोलिसांना शरण आला होता.

Advertisement

अटकेच्या भितीने आजारपणाचा बहाणा 

विद्यार्थ्यांसाठी आदर्श असलेल्या शिक्षकानेच असे कृत्य केल्याचे काही विद्यार्थ्यांच्या पालकांनाही पचनी पडलेले नाही. रविवारी उशिरा रात्री संशयित योगेशवर भा.न्या. सं. 318(4) 3 (5) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने प्रथम त्याला फोंडा उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर आयबीएचपी पणजी येथे पाचारण करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याची 3 दिवसांच्या रिमांडवर कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी फोंडा पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहे.

योगेशच्या पाठिमागे मास्टरमाईंड महिला 

संशयित कमिशन एजंट योगेश सिनाय कुंकळकर याने सदर प्रकरणी आपण केवळ मध्यस्थ म्हणून भूमिका बजावल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी मास्टरमाईंड अन्य एक महिला आहे. पोलिस मास्टरमाईंड महिलेच्या शोधात आहेत. ती मडगाव येथे असल्याचा सुगावा लागलेला असून बहुतेक आज मंगळवारी तिला अटक होणार आहे. त्यानंतर याप्रकरणी घोटाळ्याचे नेटवर्क कुठपर्यंत पोहोचले आहे, हे स्पष्ट होणार आहे. विद्यार्थ्यांना आदर्श वाटणाऱ्या या शिक्षकाने आपण स्वत:हून कमिशन एजंट असल्याचे पोलिसांकडे कबूल केले आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत रविवारी दिवस उजाडेपर्यंत फोंडा पोलिसस्थानकात ठाण मांडून होत्या. निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांच्याकडून सर्व संशयितांची जबानी व कमिशन एजंट संशयित शिक्षक योगेश कुंकळकर याची जबानी घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती. योगेश कुंकळकर याच्या नावावर असलेली वाहने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी दिली. या 1.25 कोटी ऊपयांचे हे प्रकरण भाजपा पदाधिकाऱ्यासह 13 जणांविरोधात फोंडा पोलिसस्थानकात तक्रार दाखल होणार होती. हे प्रकरण निकाली काढण्यासाठी भाजपा सरकारमधील सर्वोच्च नेतृत्व दबाव आणत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते गिरीष चोडणकर यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article