महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अदानी विल्मरच्या नफ्यात दुप्पट वाढ

06:58 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

अदानी समूहातील कंपनी अदानी विल्मरने आपल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. शेअरबाजाराला दिलेल्या माहितीनुसार अदानी विल्मरने डिसेंबरच्या तिमाहीत 411 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे, जो मागच्या तुलनेत दुप्पट आहे.

Advertisement

दुसरीकडे कंपनीच्या उत्पन्नात कमालीची वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीचे एकत्रित उत्पन्न 12,828 कोटी रुपयांवरुन 16,859 कोटी रुपयांवर पोहचले आहे. वर्षाच्या आधारावर तिसऱ्या तिमाहीत विक्रीत 5 टक्के वाढ राहिली होती. खाद्य तेलाच्या विक्रीत 4 टक्के वाढ झाली असून खाद्य व एफएमसीजी उत्पादनांच्या विक्रीत वर्षाच्या आधारावर पाहता 23 टक्के वाढ झाली आहे.  याचदरम्यान शेअरबाजारात अदानी विल्मरचे समभाग हे नीचांकावरुन 5 टक्के इतके वाढलेले दिसले.  एनएसईवर कंपनीचे समभाग 0.4 टक्के वाढत 253 रुपयांवर व्यवहार करत होते.

अदानी टोटलचा नफा घटला

दुसरीकडे अदानी टोटल गॅसचा तिमाही निकाल घोषित झाला असून तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 142 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला आहे. मागच्या आर्थिक वर्षात समान तिमाहीच्या तुलनेत नफा 19 टक्के इतका कमी राहिला आहे. मागच्या आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत नफा 176 कोटी रुपयांचा होता. याच अवधीत कंपनीने 12 टक्के वाढीसह 1400 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia