9 लाख कोटींच्या कापड निर्यातीचे 2030 पर्यंतचे ध्येय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास : अर्थसंकल्पातही निधीची तरतूद केल्याचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत 2030 पर्यंत जवळपास 9 लाख कोटी रुपयांची कापड निर्यात करणार असल्याचे ध्येय निश्चित केले आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पात 2025-26 मध्ये विशेष करुन तरतूद करण्यात आली असून विविध प्रकाराच्या उत्पादनांमध्ये वाढ करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहितीही पंतप्रधान मोदी यांनी दिली. ते ‘भारत टेक्स2025’ च्या कार्यक्रमात बोलत होते.
सध्या भारताची सुरु असलेली कापड क्षेत्रातील धडपड पाहता, 2030 च्या जवळपास आपण प्रत्यक्षपणे निर्यातीचे सर्वात मोठे ध्येय प्राप्त करण्यात यशस्वी होणार आहोत. कारण देशात कापड निर्यात ही सात टक्क्यांच्या वाढीच्या आसपास राहिली असल्याचेही मोदी यांनी नमूद केले आहे. सदरच्या क्षेत्रातील योगदानात 11 टक्के वाटा आहे.
एका विश्लेषणानूसार 2030 पर्यंत फॅशनशी संबंधीत उलाढाल ही 14.8 कोटी टनावर पोहोचणार आहे. नवी दिल्लीत 14 ते 17 फेब्रुवारीपर्यंत पार पडलेला ‘भारत टेक्स’ हा कार्यक्रम कापड उद्योगासाठी आवश्यक ठरणार आहे.
तंत्रज्ञानावर पूर्ण विश्वास : पंतप्रधान मोदी
पीएम मोदी म्हणाले, ‘आमचे लक्ष कापड क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करणे व त्याच्या आधारे कापड क्षेत्रात आवश्यक ते बदल घडवून आणणे आहे. सदरच्या ‘भारत टेक्स’ मधून भारत एक मोठे जागतिक केंद्र निर्माण व्हावे ही इच्छा आहे. यामध्ये संपूर्ण 120 ते त्यापेक्षा अधिक देश जोडले गेले आहेत. यामुळे भारतासह अन्य देशांना या गोष्टींचा लाभ होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.