अदानी टोटल गॅसचा नफा 7.51 टक्क्यांनी वाढला
वाढीसह 186 कोटींवर : महसूल 12 टक्क्यांनी मजबूत
वृत्तसंस्था/ मुंबई
अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी टोटल गॅसने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 186 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. त्यात वार्षिक आधारावर 7.51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 173 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 1318 कोटी रुपये होता. त्यात वार्षिक 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 1179 कोटी रुपयांवर होता.
तिमाही आधारावर नफ्यात3 टक्के वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) कंपनीला 172 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तिमाही दर तिमाही आधारावर 8 टक्क्यांनी वाढला आहे. या कालावधीत टोटल गॅसने 1239 कोटी रुपयांची कमाई केली. तिमाही आधारावर यात 6.40 टक्केची वाढ झाली आहे.
काय म्हणाले सीईओ..
अदानी टोटल गॅसचे सीईओ आणि ईडी सुरेश पी मंगलानी यांनी निकालावर सांगितले की, आम्ही आमच्या पाइप्ड गॅस नेटवर्कद्वारे 9 लाखांहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचलो आहोत, जे पाइप्ड नैसर्गिक वायूचा अखंड पुरवठा करते. वाहतूक विभागातील वाढीसाठी आम्ही पहिले एलएनजी स्टेशन सुरू केले आहे.