महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाटगाव मध्यम प्रकल्पावरील अदानी प्रकल्प अखेर रद्द; आमदार प्रकाश आबिटकर यांची माहीती

04:05 PM Jan 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
MLA Prakash Abitkar
Advertisement

गारगोटी प्रतिनिधी

भुदरगड तालुक्याकरीता पाटगांव मध्यम प्रकल्पातील पाण्याचा प्रत्येक थेंब अत्यंत महत्वपुर्ण आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील 115 हून अधिक गाव व वाड्यां-वस्त्यांवरील नागरीक व शेती अवलंबून आहेत. पाटगाव मध्यम प्रकल्प येथे अदानी ग्रीन एनर्जी लिमीटेड कंपनी मार्फत हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प उभारण्यात येणार होता. यामुळे भुदरगड वासीयांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता होती. सदर प्रकल्प रद्द करावा यासाठी भुदरगड वासीयांसह सर्वपक्षीयांनी आंदोलन केले होते. सदर प्रकल्प रद्दा करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन दिले होते. अखेर या सर्वांच्या मागणीस यश आले असून पाटगाव मध्यम प्रकल्प येथे अदानी ग्रीन एनर्जी लिमीटेड कंपनी मार्फत उभारण्यात येणारा प्रकल्प अखेर रद्द झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

Advertisement

निवेदनात म्हटले आहे की, भुदरगड तालुक्यातील पाटगाव मध्यम प्रकल्पाचे पाणी भुदरगड तालुक्याकरिता जीवनदायी आहे. या प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्यातील सुमारे 12070 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली येते. प्रस्तावित पाटगाव प्रकल्पाकरिता अदानी ग्रीन एनर्जी लिमीटेड कंपनी मार्फ़त अंजिवडे ता.कुडाळ जि.सिंधुदुर्ग गावाजवळ नविन धरण बांधण्यात येणार असुन त्याधरणामध्ये तळंबा खो-यातील साठविलेले पाणी उचलुन पाटगाव मध्यम प्रकल्पामध्ये साठवण्यात येणार असुन त्याचा वापर करुन 2100 मेगावॅट वीजनिर्मिती होणार असल्याचे समजते. या प्रकल्पामुळे भुदरगड तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. यामुळे भुदरगड तालुक्यातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले असून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थाता होती. यामुळे सदरचा प्रकल्प रद्द व्हावा याकरीता भुदरगड तालुक्यातील नागरीक व सर्वपक्षीय नेतेमंडळींनी अनेक आंदोलने केली होती. यामुळे सदरचा प्रकल्प रद्द करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे निवेदनाव्दारे केली होती. या पाठपुराव्यास यश आले असून आदानी ग्रुप मार्फत दि.23 जानेवारी, 2024 रोजी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना पत्र लिहून सदर प्रकल्प रद्द केला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#MLA Prakash AbitkarAdani projectmedium projectpatgaonTarun Bahrarat News
Next Article