अदानी पोर्ट्सची मालवाहतूक व्यवसायात दमदार कामगिरी
तिमाहीत 37 दशलक्ष मेट्रीक टनची मालवाहतूक : 48 टक्के वाढ
मुंबई :
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन यांनी ऑक्टोबरमध्ये 37 दशलक्ष मेट्रिक टन इतकी दमदार मालवाहतूक करत कार्गो व्यवसायामध्ये 48 टक्क्यांची वाढ दर्शवली आहे. इतिहासात पहिल्यांदाच कंपनीने अशी कामगिरी केली असल्याचे बोलले जात आहे.
कंपनीने भारतात 35 दशलक्षपेक्षा जास्त मालवाहतूक करून नोंदणीय कामगिरी केली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता जवळपास 43 टक्क्यांची वाढ करण्यात कंपनीला यश मिळालं आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या सात महिन्यांमध्ये म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान 240 दशलक्ष मेट्रीक टन मालवाहतूक करण्यात आली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता यामध्ये 18 टक्के वाढ नोंदवली आहे.
सर्व बंदरांचा व्यवसाय तेजीत
भारतातील सर्वच बंदरांवरचा मालवाहतूकीचा व्यवसाय वाढला असल्याची बाबही समोर आली आहे. वर्षाच्या आधारावर पाहता सर्वच बंदरांनी 15 पंधरा टक्केपेक्षा जास्त विकास साध्य केला आहे.