For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अदानी पोर्ट्सचा नफा 76 टक्क्यांनी वधारला

06:58 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
अदानी पोर्ट्सचा नफा 76 टक्क्यांनी वधारला
Advertisement

वाढीसोबत नफा 2,014 कोटींवर : कंपनीचे उत्पन्न 19 टक्क्यांनी मजबूत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

अदानी पोर्ट्स या अदानी समूहाच्या कंपनीने चौथ्या तिमाहीतील आर्थिक वर्ष 2024चे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2024 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत, कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 76.87 टक्केने वाढून 2,014.77 कोटी रुपये झाला आहे.

Advertisement

गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 1,139.07 कोटी होता. तर गेल्या तिमाहीत तो 2,208.21 कोटी रुपये होता. म्हणजेच कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात तिमाही आधारावर 8.76 टक्केने घट झाली आहे.

अदानी पोर्ट्सने 6 रुपयांचा लाभांश जाहीर केला. निकालांसोबतच अदानी पोर्ट्सच्या संचालक मंडळाने त्यांच्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 6 रुपये लाभांश देण्यासही मान्यता दिली आहे.

कंपनीचा महसूल 19 टक्केने वाढून 6,896.50 कोटी रुपये झाला आहे.

चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल (उत्पन्न) वार्षिक 19 टक्क्यांनी वाढून 6,896.50 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत तो 5,796.85 कोटी रुपये होता.

आर्थिक वर्षात नफ्यात 50 टक्के वाढ

संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीच्या एकत्रित नफ्यात 50.32 टक्केची वाढ नोंदवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 24 मध्ये कंपनीचा एकत्रित नफा 8,103.99 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच आर्थिक वर्ष 23 मध्ये अदानी पोर्ट्सचा नफा 5,390.85 कोटी रुपये होता.

देशातील सर्वात मोठी कंपनी

अदानी पोर्ट्स ही देशातील सर्वात मोठी पोर्ट ऑपरेटर आहे.  कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये कार्गोचे प्रमाण 460 ते 480 मेट्रिक टन दरम्यान ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 23 टक्के अधिक आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2024 साठी 390 मेट्रिक टन उद्दिष्ट ठेवले होते.

Advertisement
Tags :

.