अदानी समूह तेलंगणात करणार 12 हजार कोटींची गुंतवणूक
नवी दिल्ली :
अदानी समूहातील कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आपल्या प्रकल्पांसाठी 12 हजार 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या अंतर्गत अदानी समूहात 600 जणांना रोजगार प्राप्त होऊ शकणार आहे. बुधवारी अदानीने यासंदर्भात तेलंगणा सरकारसोबत सहकार्याचा करार केला आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांच्या उपस्थितीत करारावर उभय पक्षांकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पुढील 5 वर्षाच्या कार्यकाळात 100 मेगावॅटच्या डाटा सेंटरकरीता 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यायोगे आगामी काळात 600 जणांना कंपनी रोजगार देणार आहे. त्याचप्रमाणे अंबुजा सिमेंट ही कंपनी वार्षिक 60 लाख टन क्षमतेचा सिमेंट निर्मिती कारखाना उभारणार असून याकरीता अदानी समूह 1400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दुसरीकडे समूहातील कंपनी अदानी डिफेन्स सिस्टम्स अँड टेक्नॉलॉजीदेखील ड्रोन व क्षेपणास्त्र प्रणालीच्या संशोधन, विकास आणि डिझाइनकरीता 1 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचीही माहिती मिळते आहे.