महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अदानी गो बॅक... महावितरण कर्मचारी आक्रमक

12:40 PM Jan 03, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

वीज ग्राहकांना लुटण्याचा प्रयत्न
खाजगीकरण विरोधात महावितरण कर्मचाऱ्यांचे निदर्शने : शंभूराज कटकर
सांगली

Advertisement

एमएससीबी कर्मचारी संघटनेतर्फे महावितरणच्या खासगीकरणाविरोधात निदर्शने करण्यात आली. अदानी कंपनीच्या मार्फत बसवण्यात आलेल्या प्रीपेड वीज मीटरच्या विरोधात ही निदर्शने करण्यात आली, अशी माहिती एमएससीबी कर्मचारी संघटनेचे महेश जोताराव यांनी दिली.
सांगली विश्राम बाग सर्कल कार्यालयाच्या समोर वीज ग्राहक संघटना आणि वीज वितरक संघटनेच्यावतीने खासगीकरणाविरोधात आंदोलन करण्यात आले. आजपर्यंत सरकारने शासकीय कंपनी एअर इंडिया, इंडियन ऑईल, बीपीसीएल सारख्या यांचे खासगीकरण केलेले आहे. यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज मंडळ विकण्याचा निर्धार या सरकारने केलेला आहे. पंतप्रधानांचे निकटवर्तीय अदानी यांना आमच्या सांगली जिल्ह्याचा ठेका दिलेला आहे. सरकारी मालमत्ता फुकट वापरायला देऊन प्रीपेड मीटरच्या माध्यमातून ग्राहकांची लूट सुरू आहे. याबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता केलेली नाही. तसेच या खासगीकरणामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी होणार असून ही सरकारी मालमत्ता खासकी उद्योजकाच्या घशात जाणार आहे. जरी हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी पेटवले असेल तरी यामध्ये जनतेने सहभागी व्हावे. ज्यावेळी या खासगीकरणामुळे नागरिकांचे लाईटबील वाढून येईल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल. तरी नागरिकांनी जागे होऊन या खासगीकरणाविरोधात लोकलढा उभारला पाहीजे, यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभु काटकर यांनी नागरिकांना आवाहन केले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article