महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अॅड.नरेंद्र सावईकर यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल !

10:05 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून अभिष्ठचिंतन

Advertisement

फोंडा : गोव्यात भाजपाच्या जडणघडणीपासून सत्तास्थापनेपर्यंतच्या प्रवासात अॅड. नरेंद्र सावईकर यांचे पक्षासाठी महत्त्वाचे योगदान राहिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत विविध मतदारसंघामध्ये भाजपाच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी ते अहोरात्र वावरले. पक्षासाठी निस्वार्थीपणे कार्य करताना दिलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पेलली. सावईकर यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे आणि त्यांच्या पुढील राजकीय प्रवासात आमचा त्यांना नेहमीच पाठिंबा व सहकार्य असेल, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्या.

Advertisement

दक्षिण गोव्याचे माजी खासदार व प्रदेश भाजपाचे सरचिटणिस अॅड. नरेंद्र सावईकर यांचा वाढदिन सोहळा काल शुक्रवार 29 रोजी बेतोडा रोड, फोंडा येथील अॅग्रीबाजार संकुलाच्या ग्रँड सेलिब्रेशन सभागृहात थाटात साजरा करण्यात आला.   पत्नी मेघना सावईकर व मुलगी ईशा सावईकर यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. सावंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री, आमदार पक्षाचे पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते व हितचितकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून सावईकर यांना शुभेच्छा दिल्या. सावईकर यांनी राजकीय, सामाजिक, सहकार अशा विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्त्व गुणांच्या जोरावर व कर्तृत्त्वाची मोहोर उमटविली आहे. त्यांच्या पुढील राजकीय प्रवासात अजून मोठी पदे त्यांच्या वाट्याला येतील, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांना दिल्या.

भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते : नाईक

मंत्री श्रीपाद नाईक यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात, भाजपामधील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांपैकी नरेंद्र सावईकर यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांमुळे पक्षाचा विविध अंगानी विस्तार झाल्याचे सांगितले. राजकारणाच्या माध्यमातून समाजासाठी त्यांनी केलेले आजवरचे कार्य निस्वार्थी भावनेने केले. कार्यकर्त्यांसाठी त्यांचे हे कार्य नेहमीच प्रेरणादायी आहे.

 सावईकर कुशल संघटक : तवडकर

सभापती रमेश तवडकर, म्हणाले नरेंद्र सावईकर यांना आपण विद्यार्थी चळवळीपासून ओळखतो. त्यांच्यामध्ये संघटन कुशलता व कामाची प्रचंड उर्जा आहे. काणकोणमधून कार्यकर्त्यांचे त्यांना नेहमीच पाठबळ लाभेल.

काम तडीस नेणे खासियत : तानावडे

नरेंद्र सावईकर यांच्यावर एखादी जबाबदारी दिली म्हणजे, ती तेवढ्याच आत्मियतेने व तडफेने तडीस नेणे ही त्यांची खासियत. पक्षाने सोपविलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी लिलया पेलल्या. दक्षिण गोव्याचे माजी खासदार म्हणून त्यांनी जनतेला नेहमीच न्याय दिला.  केवळ राजकीय नव्हे, तर सहकार व अन्य क्षेत्रातही त्यांनी निष्ठेने कार्य केले, असे गौरवोद्गार सदानंद तानावडे यांनी काढले. मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, सावईकर यांनी ज्या ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले त्यात हमखास यश मिळविले. त्यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवा व त्यात खात्रीशीर यश मिळते. गोव्याच्या विकासासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असून सर्व स्तरातील लोक त्यांच्यासोबत आहेत. पक्ष उमेदवारीसाठी त्यांचा निश्चित विचार करेल, अशी आशा व्यक्त केली.

अॅड. नरेंद्र सावईकर यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी आयोजित केलेला हा सोहळा व असंख्य चाहत्यांच्या शुभेच्छांमुळे आपण भारावून गेल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. पक्षासाठी सर्वांनी असेच एकसंघ राहून कार्य करण्याचे आवाहन केले. पर्यटनमंत्री रोहन खंवटे, क्रीडामंत्री गोविंद गावडे, आमदार गणेश गावकर, संकल्प आमोणकर, उल्हास तुयेंकर, माजीमंत्री महादेव नाईक, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी आमदार व पक्षाचे सरचिटणिस दामोदर नाईक, माजी सभापती विश्वास सतरकर, गोविंद पर्वतकर, संजू देसाई, अॅङ मनोहर आडपईकर, माजी आमदार वासुदेव मेंग गांवकर यांच्यासह मडगाव, फोंडा व अन्य नगरपालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध पंचायतींचे सरपंच पंचसदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, असंख्य कार्यकर्ते व हितचिंतकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून सावईकर यांना शुभेच्छा दिल्या. सकाळच्या सत्रात कृषीमंत्री रवी नाईक, मंत्री आलेक्स सिकेरा, आमदार दिगंबर कामत, दाजी साळकर व अन्य मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. मनोहर भिंगी यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article