महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अभिनेत्री-गायिका मल्लिका राजपूतची आत्महत्या

06:49 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

Advertisement

वृत्तसंस्था/ सुल्तानपूर

Advertisement

प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री-युट्यूबर मल्लिका राजपूर उर्फ विजयलक्ष्मीने आत्महत्या केली आहे. उत्तरप्रदेशच्या सुल्तानपूर येथे तिने स्वत:चे आयुष्य संपविले आहे. मल्लिका ही स्वत:च्या आईसोबत मुंबईत वास्तव्यास होती, परंतु अलिकडेच ती गावी परतली होती. तिचा मृतदेह मंगळववारी खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला आहे.

मल्लिका राजपूर ही रिवॉल्वर रानी या हिंदी चित्रपटात दिसून आली होती. याचबरोबर ती भाजपचे सदस्य राहिली होती. परंतु 2018 मध्ये तिने भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. अभिनय आणि गायनाच्या क्षेत्रात कारकीर्द घडविण्यासोबत ती एक युट्यूब चॅनेलही चालवत होती.  तिने चार वर्षांपूर्वी प्रदीप शिंदे या व्यक्तीसोबत विवाह केला होता. वैवाहिक जीवनात अभिनेत्री समस्यांना सामोरी जात होती, याचमुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article