कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अभिनेत्री रान्या रावला कोर्टात अश्रु अनावर....

12:23 PM Mar 08, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

गोल्ड स्मगलिंगचा आरोपामुळे रान्याच्या अडचणीत वाढ

Advertisement

नवी दिल्ली

Advertisement

कन्नड अभिनेत्री रान्या राव हिच्यावर दुबईमधून सोन स्मगलिंग रुपाने भारतात आणल्याचा आरोप आहे. आरोपानंतर तीन दिवसाच्या डीआरआय कस्टडीमधून तिची आता सुटका झाली आहे. या आरोपाखाली रान्याला जेव्हा कोर्टात उभे केले, तेव्हा अभिनेत्रीला अश्रु अनावर झाले. यावेळी तिने पश्चातापाची भावनाही व्यक्त केली. या सगळ्या प्रकरणात मी का फसले याबद्दल तिने प्रश्न उपस्थित करत, अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

यावेळी रान्या आपल्या वकीलांशी बोलताना म्हणाली, जेव्हा मी एअरपोर्टवरील तो दिवस आठवते तेव्हा माझ्या अंगावर काटा येतो. या सगळ्या प्रकरणामुळे माझी रात्री झोप हरवून गेली आहे. मला या सगळ्या विचारांनी झोपच लागत नाही आहे. मी मेंटल ट्रॉमा मध्ये आहे.
याप्रसरणी चौकशीच्या वेळीही रान्याला अनेकदा रडू कोसळले. त्यामुळे ती काही प्रश्नांची उत्तरेही देऊ शकली नाही.

काय आहे नेमके प्रकरण ?
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला ३ मार्च रोजी अटक झाली. बेंगलुरू येथील विमानतळावरून डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआरआय) च्या टीम ने तिला अटक केली. यावेळी तिने यावेळी पकडले जाऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले, पण अखेर तिला अटक करण्यात आली. या प्रकरणी सध्या अधिक चौकशी होत आहे. तरी याच्या मागे मोठे षड़यंत्र असण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. तिच्यावर गोल्ड स्मगलिंग चे आरोप आहेत. कोर्टात केलेल्या आरोपानुसार, रान्याने क्रेप बॅंडेज बांधून त्यातून सोने स्मगल करण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक माहितीनुसार १२.५६ कोटी रुपयांची सोन्याची तस्करी केली जात होती. यावरची ४.८३ कोटींची कस्टम ड्युटी वाचवण्यासाठी हा प्रकार घडल्याचेही समजत आहे.

डीआरआय ने दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री रान्या ६ महिन्यामध्ये २७ वेळा दुबईला जाऊन आली आहे. याविषयी अधिक चौकशी केली असता, रान्याने दुबईमध्ये रिअल इस्टेट बिझनेस सेक्टरमध्ये फ्रिलान्सर काम करत असल्याची सांगितले. याशिवाय तिने १७ गोल्ड पिस स्मगल केल्याचे आरोप मान्य केले आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article