महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अभिनेत्री पूनम पांडेचे कर्करोगाने निधन

06:42 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Actress Poonam Pandey
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, कानपूर

Advertisement

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचे निधन झाले आहे. तिला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाला होता. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती देण्यात आली आहे. तिच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पूनम पांडेच्या मॅनेजरने हा खुलासा केला आहे. पूनमने आपल्या मूळ गावी कानपूरमध्ये अखेरचा श्वास घेतला. 1 फेब्रुवारीच्या रात्री गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढा सुरू असताना तिने अखेरचा श्वास घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तिच्या अंत्यसंस्काराच्या तपशीलाची तत्काळ माहिती देण्यात आली नव्हती. तसेच मृत्यूबाबत सोशल मीडियावर साशंकता व्यक्त केली जात असल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Advertisement

पूनम पांडे एक लोकप्रिय मॉडेल होती. अलिकडेच तिला कर्करोगाच्या आजाराची माहिती मिळाली असून ती गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या चौथ्या स्टेजमध्ये असल्याचे बोलले जात होते. पूनम पांडेने 2013 मध्ये ‘नशा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने होस्ट केलेल्या ‘लॉकअप’च्या पहिल्या सीझनमध्ये ती दिसली होती. सदर शो ती जिंकू शकली नसली तरी तिने आपला चाहता वर्ग वाढवला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social mediaActress Poonam Pandeycancerpassed away
Next Article