For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनोदाचे पंच मारणाऱया या अभिनेत्याने उघडले डोळे

06:50 AM Apr 18, 2022 IST | Tarun Bharat Portal
विनोदाचे पंच मारणाऱया या अभिनेत्याने उघडले डोळे
Advertisement

मराठी सिनेमा, नाटक, मालिका या माध्यमातील विनोदी कलाकारांच्या परंपरेच्या मुळाशी गेल्यानंतर आपल्याला एक गोष्ट नक्की कळेल आणि ती म्हणजे पडद्यावर खळखळून हसवणारे हे विनोदवीर बरेचदा डोळय़ात टचकन पाणी आणणारी, अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट सांगून जातात. हसता हसता रडवणाऱया अशा अस्सल कलाकारांच्या पंक्तीतला अभिनेता कुशल बद्रिकेही त्याच्या सोशल मीडियावर कानपिचक्या घेत असतो. कुशलने आता काय नवी पोस्ट करून वास्तवाचे चिमटे घेतलेत हे बघायला, वाचायला त्याचे चाहते नेहमीच आतूर असतात. नुकताच कुशलने त्याच्या इन्स्टा पेजवर ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट करत भन्नाट कॅप्शन दिली आहे.

Advertisement

त्यात तो असं म्हणतोय की, आपल्या कलर फोटोतील रंग फिके झाले असतील तर तो फोटो ब्लॅक अँड व्हाईट मोडमध्ये करून पोस्ट करावा. त्यामुळे फोटोही छान दिसतो आणि पुसट झालेले रंगही झाकले जातात.  हा विचार फक्त सोशल मीडियावरील फोटोपुरताच करू नये तर आयुष्यातील काही क्षणांच्या बाबतीतही करावा. कारण एक वेळ आयुष्यात येणाऱया क्षणांना मुलामा असलेले रंग नसले तरी चालतील, ते ब्लॅक अँड व्हाईट असले तरी चालतील पण बरबाद करणारे खोटे रंग आयुष्यातील कोणत्याच क्षणांना असू नयेत. कुशलच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करून त्याच्या विनोदापलीकडील विचाराला दाद दिली आहे. तसेच तुझे फोटो कधी फिके पडणार नाहीत, तू नेहमीच उत्साही आणि आकर्षक राहशील, अशीही कमेंट कुशलला आली आहे.

चला हवा येऊ द्या या शोमधून कुशल बद्रिके हा अवलिया प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याच्या स्त्राrपात्राला तर धमाल प्रतिसाद मिळतो. विनोदाचं अचूक टायमिंग आणि सहजसुंदर अभिनय यामुळे कुशलने विनोदी अभिनेत्यांच्या पंक्तीत खास जागा मिळवली आहे. कुशल गंभीर भूमिका करण्यातही बाप आहे. अभिनेते दादा कोंडके यांच्या स्मृती जागवण्यासाठी विजू माने यांनी पडद्यावर आणलेल्या पांडू या सिनेमात म्हादू हवालदारची भूमिका कुशलने लिलया साकारली. कुशल हा सोशल मीडियावर सतत ऍक्टीव्ह असतो. मध्यंतरी त्याने पत्नीसोबत आयुष्यातील संघर्षावर केलेली पोस्टही खूप व्हायरल झाली होती. तर विजू माने यांच्यासोबत एका भिंतीवर लिहिलेल्या टू व्हिलर या चुकीच्या इंग्रजी शब्दावरून आजच्या शिक्षणाचा समाचार घेणारा व्हिडिओ पोस्ट केला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.