महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अभिनेता थलपथी विजयवर अज्ञाताकडून चप्पलफेक

06:05 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

दिवंगत अभिनेते आणि राजकारणी पॅप्टन विजयकांत यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी अभिनेता थलपथी विजयवर अज्ञात व्यक्तीने चप्पलफेक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चप्पलफेकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. थलपथी विजय यांनी या घटनेवर तात्काळ काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांच्या चाहत्यांनी या घटनेचा निषेध करत निवेदन जारी केले आहे.

Advertisement

विजयकांत यांना श्र्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवार, 28 डिसेंबरच्या संध्याकाळी चेन्नईच्या आयलँड ग्राउंडवर दक्षिण चित्रपटसृष्टीतील बडे स्टार्स एकत्र आले होते. याचदरम्यान थलपथी विजय देखील त्यांना श्र्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. यावेळी ते गर्दीतून जात असताना कोणीतरी फेकलेली चप्पल थेट त्यांच्यावर आदळली. हा गैरप्रकार कॅमेराबद्ध झाला असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. चप्पल आपल्यावर आदळल्यानंतर थलपती विजय पुढे जात राहिले, परंतु त्यांच्या मागून आलेल्या एका व्यक्तीने लगेच चप्पल उचलत आलेल्या दिशेलाच पुन्हा फेकली. मात्र, चित्रपट अभिनेत्यावर हा हल्ला का झाला हे समजू शकले नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article