महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा चाकू हल्ला

10:03 AM Jan 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. सैफच्या मावेर तब्बल 10 सेमीची जखम झाली आहे. सैफ अली खानच्या पाठीवरही घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीनं वार केले. सैफच्या पाठीत त्या व्यक्तीनं धारदार शस्त्र खुपसलं. सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शस्त्रक्रिया करुन त्याच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यात आलं. पाठीत घुपसलेलं शस्त्र धारदार आणि टोकेरी होतं. सैफच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

Advertisement

मध्यरात्री सैफच्या घरात नेमकं घडलं काय? 

Advertisement

सैफ अली खान आणि करिना कपूर वांद्रे येथे राहतात. याच घरात रात्री अडीचच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती घुसली. धक्कादायक बाब म्हणजे, सैफची लहान मुलं ज्या रुममध्ये झोपलेली, त्याच रुमच्या बाल्कनीमधून त्या अज्ञात व्यक्तीनं सैफच्या रुममध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. सैफच्या घरात काम करणाऱ्यांनी त्या व्यक्तीला पाहून आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर घरातील सर्वांना जाग आली. सैफ अली खान तातडीनं उठून रुममधून बाहेर येत होता. त्यावेळी घरात घुसलेली व्यक्ती आणि सैफ आमने-सामने आले. त्यानंतर त्या व्यक्तीनं हातातल्या धारदार शस्त्रानं सैफवर वार केला. यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रात्री सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article