अभिनेता मेहरजान माजदा विवाहबध्द
नेटफ्लिक्सची लोकप्रिय सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये जीजीभाई ही भूमिका साकारणारा अभिनेता मेहरजान माजदा याने विवाह केला आहे. अभिनेत्याने दीर्घकाळापासून प्रेयसी राहिलेल्या नाओमी फेलफेलीसोबत पारंपरिक पारशी प्रथेने विवाह केला आणि सोशल मीडियावर स्वत:च्या चाहत्यांसोबत ही आनंदाची गोष्ट शेअर केली आहे. या जोडप्याच्या विवाहसोहळ्यात केवळ परिवाराचे सदस्य आणि मित्र सामील झाले.
‘मला अत्यंत आनंद आहे की मी तो पहिला मेसेज पाठविला...हे, मिसेस माजदा!’ असे अभिनेत्याने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. त्याच्या या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. इंडो-इराणी वंशाची नाओमी फेलफेली ही स्वत:च्या खासगी आयुष्याला प्रसिद्धीच्या झोतापासून दूर ठेवणे पसंत करते. मेहरजान माजदाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रभावी कारकीर्द निर्माण केली आहे. अलिकडेच तो आर्यन खानची सीरिज ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये लक्ष्य, बॉबी देओल, सहर बंबा, मनोज पाहवा आणि मोना सिंहसोबत दिसून आला. त्यापूर्वी ब्रोकन बट ब्युटीफुल, मॉडर्न लव मुंबई, ढाई किलो प्रेम आणि दास्तान-ए-मोहब्बत : सलीम अनारकलीमधील अभिनयाद्वारे प्रेक्षकांनी त्याने मने जिंकली होती.