महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अभिनेते किरण माने यांचा शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश

04:25 PM Jan 07, 2024 IST | Kalyani Amanagi
Advertisement

सोशल मीडियावर राजकीय पोस्ट तसेच राजकीय वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारे मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी हातात शिवबंधन बांधलं आहे.

Advertisement

बीडमधील काही कार्यकर्त्यांसह अभिनेते किरण माने यांनी शिवबंधन हाती बांधलं. यावेळी तुम्हाला जे पाहावत नाही ते खरं आहे. माने तुमच्याकडे शब्दाची ताकद आहे. आपण दोघेही लढू. सेनेत तुम्हाला पश्चाताप होणार नाही. आलात त्याचा अभिमान वाटेल पुढेही ही लढाई केवळ राजकारण किंवा सत्ताकारणासाठी नसून महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Advertisement

तर ठाकरे गटात प्रवेश करत किरण माने म्हणाले, मी एक सामान्य कलाकार आहे. पक्षाकडून जी जबाबदारी मिळेल ती निष्ठेने पार पाडेन. शिवसेना सर्वसामान्यांची आहे. राजकारण गढूळ झालेलं असताना एकटा माणूस लढत आहे. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता तसेच माणूस म्हणून त्यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला.

माने पुढे म्हणाले की, सध्या संविधान वाचवण्याची आणि लोकशाही वाचवण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्यात आहे. त्यांच्या या कामात मी त्यांच्यासोबत आहे. किरण माने हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेते आहेत. 'सातारचा बच्चन' म्हणून ते ओळखले जातात. 'सिंधुताई माझी माई', 'मुलगी झाली हो' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. राजकीय पोस्ट केल्याने 'मुलगी झाली हो' या मालिकेतून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

Advertisement
Tags :
#entry#thakare#uddhavthakarekiran maneshivsena
Next Article