कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नारायण राणे थोड्याच वेळात दाखल करणार उमेदवारी अर्ज !

12:18 PM Apr 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

राणेंना पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरीत कार्यकर्त्यांची गर्दी

Advertisement

सावंतवाडी

Advertisement

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव जाहीर झाले. आणि गेल्या काही दिवसांपासूनचा शिंदे गटाचा उमेदवार की भाजपचा उमेदवार यावर होणाऱ्या चर्चेला पूर्णतः विराम मिळाला . आज हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरीच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्थात जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांचा उमेदवारी अर्ज अगदी थोड्याच वेळात सादर करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीत रॅलीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे . नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्याने महायुतीतील पदाधिकारी , कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते राणेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी रत्नागिरीत हजर झाले आहेत .

Advertisement
Tags :
# tarun bharat news# narayan rane # ratnagiri sindhudurg# loksabha
Next Article