महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पारंपरिक मार्गात बदल केल्याने कार्यकर्त्यांची नाराजी

11:35 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : मिरवणुकीला उशीर झाल्याने पोलिसांनी चव्हाट गल्ली गणेशोत्सव मंडळाला पारंपरिक मार्गाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे कॉलेज रोड असा मार्ग सूचविला. परंतु कार्यकर्ते पारंपरिक मार्गासाठी अडून बसल्याने तब्बल अडीच ते तीन तास गणेशमूर्ती एकाच ठिकाणी ठेवण्यात आली. पोलिसांच्या अडवणुकीमुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.चव्हाट गल्ली गणेशमूर्ती सकाळपर्यंत चव्हाट गल्ली परिसरातच असल्याने पोलिसांनी कॉलेज रोड मार्गे धर्मवीर संभाजी चौक असा मार्ग कार्यकर्त्यांना सांगितला. परंतु कार्यकर्ते पारंपरिक मार्गासाठीच अडून बसले होते. दरवर्षी ज्या मार्गाने गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक निघते त्याचमार्गे जाणार असल्याचे सांगण्यात आल्याने पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी मूर्ती एका ठिकाणी उभी करून थांबणे पसंत केले. अखेर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी काही अटी घालत पारंपरिक मार्गे मिरवणुकीला परवानगी दिली. या सर्व प्रकारामध्ये अडीच ते तीन तास गेल्याने मिरवणुकीला विलंब झाला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article