महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मासळी मार्केटबाहेर मासेविक्री करणाऱ्यांवर होणार कारवाई

03:24 PM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा

Advertisement

पणजी : राज्यातील अनेक शहरांत मासळी मार्केट असूनही मार्केटमध्ये न बसता रस्त्यांवर बसून मासे विक्री केली जात आहे. या प्रकारामुळे पारंपरिक मासे विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. याबाबत आपल्याकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत. रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्यांमध्ये गोव्याबाहेरील व्यावसायिक गुंतले आहेत. त्यामुळे यापुढे मार्केट परिसरातील रस्त्यांवर, उघड्यावर मासे विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘तऊण भारत’शी बोलताना दिला. मुख्यमंत्री म्हणाले, रस्त्यांवर मासेविक्री होत असल्यामुळे परिसर अस्वच्छ बनत आहे. काही वेळा वाहतूक व्यवस्थाही बिघडत आहे. हा प्रकार थांबावा यासाठी पोलीस व संबंधितांना कारवाईचे आदेश लवकरच देण्यात येतील. काही ठिकाणी मार्केट उपलब्ध नसल्यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना अडचणीचे ठरत आहे. म्हणून ग्रामीण भागात रस्त्याच्या बाजूला बसून मासेविक्री केली जात आहे. अशा व्यावसायिकांनाही मार्केट उपलब्ध करून देण्याचा विचार सरकार करत आहे.

Advertisement

त्यांच्याकडून मासे खरेदी करु नका

नागरिकांनीही रस्त्यावर बसणाऱ्या लोकांकडून मासे खरेदी न करता मार्केटमधील व्यावसायिकांकडून खरेदी केल्यास या प्रकाराला आळा बसू शकेल. त्यामुळे लोकांनीच आता रस्त्यावर बसणाऱ्यांकडून मासे खरेदी करणे थांबवायला हवे, असेही मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article