कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli News : जिल्हा परिषदेतील बोगस लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार !

12:35 PM Oct 07, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                              सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला होता लाडकी बहीण योजनेचा लाभ

Advertisement

सांगली : शासकीय सेवेत असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, ही चूक झाली. या कृत्याबद्दल माफ करावे असे खुलासेबजा माफिनामे या योजनेच्या बोगस लाभार्थीनी जिल्हा परिषदेला दिले आहेत. या महिला कर्मचाऱ्यांवर कारवाईचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे ठेवण्यात आले आहेत.

Advertisement

सरकारी कर्मचारी असतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याप्रकरणी जिल्ह्यातील तीन ग्रामसेविका, पाच आरोग्य सेविका आणि एक महिला शिपाई अशा नऊ कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. प्रशासनाने त्यांना नोटिसा काढून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार या त्यांनी उत्तरे दिली आहेत. आता त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाई टांगती तलवार आहे.अशा बोगस लाभार्थीचा शोध महिला व बालविकास विभागाने घेतला. त्यानुसार राज्यभरातील जिल्हा परिषदांमधील १ हजार १८३ महिला कर्मचारी निष्पन्न झाले.

यामध्ये सांगलीतील नऊजणींचा समावेश आहे. त्यांनी खुलाशामध्ये एकीने म्हटले आहे की, योजनेसाठी अर्ज करताना माझे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत होते. दुसरीने म्हटले की, योजनेच्या लाभासाठी कुटुंबियांनी परस्पर अर्ज केला. त्याची माहिती मला नव्हती. तरीही माझी चूक झाली असून माफी करावी. तिसऱ्या महिलेने म्हटले आहे की, नियम व अटींची माहिती नसल्याने अनवधानाने लाभ घेतला.

लाडकी बहिण योजना ही सर्वसामा न्य महिलांसाठी शासनाने सुरू केली होती. या योजनेसाठी काटेकोर नियम करण्यात आले होते. शासकीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येणार नव्हता. मात्र, काही महिला कर्मचाऱ्यांनी नियम माहिती असतानाही १५०० रुपयांसाठी अर्ज केले. त्यांची एक वेतनवाढ रोखली जाणार असून घेतलेले पैसे वेतनातून घेतले जाणार आहेत.

जिल्हा परिषदेतील आरोग्य, सामान्य प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाने त्यांचे खुलासे घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे ठेवले आहेत. कारवाईच्या आदेशावर आता सीईओंच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediagoverment schemeladaki bahin yojanamukhyamantri ladaki bahin yojanasanglisangli news
Next Article