महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अभिनेते मन्सूर अली खानवर होणार कारवाई

06:16 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तृषा कृष्णन यांना उद्देशून आक्षेपार्ह विधान

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

अभिनेते मन्सूर अली खान हे अभिनेत्री तृषा कृष्णन यांना उद्देशून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने खान यांच्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली आहे. या टिप्पणीची दखल घेत आयोगाने पोलीस महासंचालकांना भादंविचे कलम 509 ब आणि अन्य प्रासंगिक कलमांच्या अंतर्गत कारवाई करण्याचा निर्देश दिला आहे. अशाप्रकारच्या टिप्पणींची निंदा केली जावी असे आयोगाचे म्हणणे आहे.

तृषा आणि मन्सूर यांनी अलिकडेच प्रदर्शित ‘लियो’ चित्रपटात एकत्र काम केले होते. हा तमिळ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात थलापथ विजयने मुख्य भूमिका साकारली होती. तर तृषाने नायिकेची भूमिका साकारली होती. मन्सूर अली खान यांच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली होती.

तृषासोबत काम करणार असल्याचे कळल्यावर चित्रपटात बेडरुम सीन असेल असे वाटले होते परंतु माझी निराशा झाली. मी अनेक चित्रपटांमध्ये बलात्काराची दृश्यं साकारली आहेत. परंतु निर्मात्यांनी काश्मीरमधील चित्रिकरणादरम्यान मला तृषाला पाहूही दिले नसल्याचे मन्सूर अली खान यांनी म्हटले होते.

खान यांच्या या वक्तव्याची तृषाने देखील निंदा केली आहे. मन्सूर अली खान यांनी माझ्याविषयी केलेली टिप्पणी अत्यंत घृणास्पद आहे. याला लैंगिक भेदभावपूर्ण, अपमानास्पद, महिला विरोधी मानते. मन्सूर अली खानसोबत कधी काम करावे न लागल्याने मी सुदैवी आहे. माझ्या उर्वरित कारकीर्दीतही त्यांच्यासोबत काम करावे लागू नये याची खबरदारी घेणार असल्याचे तृषाने म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article