For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपल्या अधिकारानुसार कारवाई होणार

10:17 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आपल्या अधिकारानुसार कारवाई होणार
Advertisement

जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांचे स्पष्टीकरण : आंदोलन मागे घेण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : जिल्हा पंचायत कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसांपासून रामदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवासगौडा पाटील आंदोलन करीत आहेत. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. रामदुर्ग तालुक्यातील ओबळापूर व मुदेनूर या ग्रा. पं. च्या व्याप्तीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवासगौडा गेल्या आठ दिवसापासून जि. पं. कार्यालयासमोर आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला शेतकरी संघटनांकडूनही पाठिंबा देण्यात आला आहे. यावरून शेतकरी प्रतिनिधी प्रकाश नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.

नियमानुसार संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यात आली आहे. गैरकारभार झालेली रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर काही प्रकरणे ओंबड्समन यांच्याकडे सुनावणीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे आपल्याकडून आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे. असे असतानाही आंदोलन सुरुच आहे. आपल्या अखत्यारित असणाऱ्या अधिकारावर आपण कारवाई केली आहे. पुढील कारवाई ओंबड्समन यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करता येणार नाही. ही बाब आंदोलनकर्त्यांना पटवून देण्यात आली असली तरी आंदोलन सुरूच आहे. काही प्रकरणात रक्कम वसुलीसाठी ग्रा. पं. अध्यक्षांच्या मालमत्तांवर बोजा चढविण्यात आला आहे. आता संबंधितांनी ओंबड्समन न्यायालयात अपिल केले आहे. यामध्ये आपल्याला हस्तक्षेप करता येणार नसून रामदुर्ग ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांकडूनही योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेणे आवश्यक आहे. शेतकरी प्रतिनिधी सदर बाब आंदोलकांना पटवून देऊन आंदोलन मागे घेण्यास भाग पाडावे, असे आवाहन त्यांनी केले. याबाबत आंदोलकांशी पुन्हा एकदा चर्चा करणार असल्याचे राहुल शिंदे यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.