डिजिटल फसवणुकीबाबत सतर्कतेबाबत कार्यवाही
प्रतिनिधी/ पणजी
डिजिटल आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटना आता बँकेतही घडत आहेत. त्यामुळे अनेक लोकांना फटका बसत आहे. याला आळा घालण्यासाठी तसेच अशा घटना घडू नयेत, यासाठी एचडीएफसी बँकेने डिजिटल फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी सतर्कतेबाबत करावयाच्या तीन गोष्टींच्या कार्यवाहीची माहिती दिली आहे. एलबीडब्ल्यू अॅक्शन घेण्याची विनंती बँकेने केली आहे. यामुळे ग्राहकांना वेगाने काम करुन त्यांचे नुकसान कमी करण्यासाठी बँकेने हे पाऊस उचलले आहे.
एचडीएफसी बँकेतर्फे नवीन गुन्हे जसे ‘डिजिटल अरेस्ट’ पासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गुन्हेगार हे पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांना डिजिटल अरेस्टची धमकी देतात. कर चुकवणे, नियमांचा भंग, वित्तीय अनियमितता अशा कारणांनी लोकांना धमकावण्यात येत आहे. सर्वसाधारणपणे असलेल्या अन्य फ्रॉड्समध्ये गुंतवणूक स्कॅमचा समावेश असून यात गुन्हेगार हे स्टॉक्स, आयपीओज, क्रिप्टोकरन्सी इत्यादीमध्ये गुंतवणूकीतून अधिक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून खोट्या ऑटोमेटेड इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म्सचा वापर हा समाजमाध्यमांवरुन करतात, अशा खोट्या भूलथापांना लोकांनी बळी पडू नये, असे कॉल आल्यास थेट बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.