मुतगा येथील दोन तरुणांवर गांजा सेवनप्रकरणी कारवाई
12:25 PM Jun 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन केल्याच्या आरोपावरून मुतगा येथील दोन तरुणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मारिहाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुमित अनिल अष्टेकर (वय 25), निखिल पुंडलिक इंगळे (वय 25) दोघेही राहणार मुतगा अशी त्यांची नावे आहेत. मुतग्याहून शिंदोळी येथील महालक्ष्मीपूरमकडे जाणाऱ्या रोडवर मंगळवारी सायंकाळी गांजा सेवन करताना साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. एस. रुद्रापूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 27(बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement