For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime : सांगलीत गांजा ओढणाऱ्या दोघांवर कारवाई

05:17 PM Nov 21, 2025 IST | NEETA POTDAR
sangli crime   सांगलीत गांजा ओढणाऱ्या दोघांवर कारवाई
Advertisement

                                 सांगलीत दोन युवक गांजा ओढताना पोलिसांच्या जाळ्यात

Advertisement

सांगली : शहरातील मंगळवार बाजार परिसर आणि शहरातील पोलिस लाइन क्रीडांगणाजवळ गांजा ओढणाऱ्या अथर्व रमेश माने (वय १९, रा. राजीवनगर, मंगळवार बाजार), सुमित सचिन माने (वय २४, रा. शनिवार पेठ, माधवनगर) या दोघांना पोलिसांनी पकडले.

अथर्व माने हा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास महापालिकेच्या दुकानांच्यामागे आडोशाला गांजा ओढत असताना संजयनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस कर्मचारी लक्ष्मण घेरडे यांनी याबाबत फिर्याद दिली.

Advertisement

सांगली शहरातील क्रीडांगणाजवळ झाडाखाली सुमित माने हादेखील गांजा ओढत थांबला होता. शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस कर्मचारी योगेश हाक्के यांनी त्याच्याविरुद्ध पोलीस लाइन फिर्याद दिली आहे.

Advertisement
Tags :

.