कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara : साताऱ्यात अवैध लाकूड वाहतुकीवर कारवाई ; चार आरोपींवर गुन्हे दाखल

04:44 PM Oct 13, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                    साताऱ्यात दोन वाहनांतून लाकूड वाहतूक; चार जणांविरोधात गुन्हा

Advertisement

सातारा : सातारा वनविभागाच्या भरारी पथकाने ११ ऑक्टोबर रोजी अवैधरित्या लाकूड वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करत चार जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Advertisement

पहिली कारवाई सायंकाळी ७ वाजता पिलानी (ता. सातारा) गावाच्या हद्दीत करण्यात आली. भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH04 GC 6354) उंब्रजच्या दिशेने जात असताना अडवण्यात आले. तपासणीअंती वाहनातून साग प्रजातीचा लाकूडमाल सापडला. लाकडाची वाहतूक ही कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्याने वाहन ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी ऋषीकेश सुरेश कदम (२९, रा. उंब्रज, ता. कराड) आणि अमीर अब्बास सुतार (६०, रा. कोडशी, ता. कराड) या दोघांविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वनक्षेत्रपाल करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, भरारी पथकाला खैर प्रजातीच्या लाकडाची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाबळेश्वर-सातारा मार्गावर आंबेघर (ता. जावली) येथे सापळा रचण्यात आला. १२ ऑक्टोबरच्या पहाटे ४.३० वाजता महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप (क्र. MH12 YB 1681) अडवण्यात आले. तपासणीत खैर प्रजातीचा सोलीव लाकूडमाल आढळून आला. सदर लाकूड अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी मारुती निवृत्ती भालेराव (३८, रा. भोडे, ता. मुळशी, जि. पुणे), शिवराम लक्ष्मण गोळे (५०, रा. वरुशी, ता. जावली, जि. सातारा) आणि राजू भोरया वाघमारे (४०, रा. कोथुडी सोंडेवाडी, ता. महाड, जि. सातारा) या तिघांविरोधात भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वनक्षेत्रपाल, मेढा (ता. जावली) हे करीत आहेत.

ही दोन्ही कारवाई सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक मा. अमोल सातपुते (भा.व.से.), तसेच संजय वाघमोडे, विभागीय वनअधिकारी (दक्षता), कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत गणेश महांगडे (वनक्षेत्रपाल, फिरते पथक सातारा), डी.डी. बोडके (वनपाल), रामेश्वर घुले, अश्विनी नागवे (वनरक्षक), प्रकाश वाघ (पो. कॉ.), व दीनानाथ नेहरकर (वाहन चालक) यांनी सहभाग घेतला.

Advertisement
Tags :
#crime news#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacrime newsmahrastra crimesatara crimesatara news
Next Article