आसामच्या चार क्रिकेटपटूंवर कारवाई
वृत्तसंस्था / डेहराडून
सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताकअली चषक क्रिकेट स्पर्धेत आर्थिक भ्रष्टाचारात गुंतलेल्या आसामच्या चार क्रिकेटपटूंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सदर घोषणा आसाम क्रिकेट संघटनेने केली आहे.
अमित सिन्हा, इशान अहमद, अमान त्रिपाठी आणि अभिषेक ठाकुरी हे चार क्रिकेटपटू या स्पर्धेतील सामन्यावेळी आर्थिक भ्रष्टाचारात गुंतल्याचे आढळून आले. यासंदर्भात आसाम क्रिकेट संघटनेने राज्याच्या पोलीस स्थानकामध्ये या चार क्रिकेटपटूंविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. सय्यद मुश्ताकअली क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या आसामनच्या काही क्रिकेटपटूंना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून माहिती उपलब्ध करुन घेण्याचा प्रयत्न या चार क्रिकेटपटूंनी केल्याचा आरोप आहे. या चार क्रिकेटपटूंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांना केणत्याही क्रिकेट स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.