महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उद्यमबाग येथील कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

01:54 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

उद्यमबाग येथील एका कारखान्याला कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून टाळे ठोकण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. आदेशाची प्रत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांसह बेळगाव हेस्कॉम अधिकाऱ्यांना बजावली आहे.

Advertisement

उद्यमबाग येथील सदर कारखान्याकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या सदर कारखान्याकडून वायू प्रदूषण व जल प्रदूषण झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही. तसेच नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचेही निदर्शनास आल्याने सदर कारखान्याला टाळे ठोकण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.

कारखान्याला टाळे ठोकून पुढील आदेशापर्यंत कोणतीच कार्यवाही न करण्याची सूचना मंडळाकडून करण्यात आली आहे. तर हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना कारखान्याचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भातील सूचना हेस्कॉमच्या हुबळी येथील व्यवस्थापकीय संचालक व बेळगाव येथील कार्यकारी अभियंत्यांना करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत वीज कनेक्शन स्थगित ठेवण्याचे आदेश राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article