For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालमध्ये पुन्हा ईडीकडून ‘अॅक्शन’

06:40 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंगालमध्ये पुन्हा ईडीकडून ‘अॅक्शन’
Advertisement

मंत्री सुजीत बोस, आमदार तापस यांच्या निवासस्थानी छापे

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणी पुन्हा वाढू लागल्या आहेत. नगरपालिका भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी कारवाई केली आहे. ममता सरकारमध्ये मंत्री असलेले सुजीत बोस यांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले आहेत. मंत्र्याच्या अनेक ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकरण्यात आले आहेत.

Advertisement

नगरपालिका भरती घोटाळ्याप्रकरणी तृणमूलचे आमदार तापस रॉय आणि सुबोध चक्रवर्ती यांच्या निवासस्थानही ईडीचे पथक झडती घेत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीच्या पथकाकडून तृणमूल नेते शेख यांच्या निवासस्थानी छापे टाकले असताना तृणमूल कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर ईडीने शुक्रवारी पुन्हा कारवाईस प्रारंभ केला आहे.

स्वत:च्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यासंबंधी ईडीने नजात पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली होती. तर तृणमूल नेत्याच्या कुटुंबाने तसेच राज्य पोलिसांनी  केंद्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात तक्रारी नोंदविल्या आहेत. याचदरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपने ईडीच्या अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी तृणमूल नेते शाहजहां शेख यांना अटक करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांच्या विरोधात निदर्शने केली आहेत.

ईडीच्या शुक्रवारच्या कारवाईवेळी मोठ्या संख्येत सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. राज्याचे अग्निशमन मंत्री सुजीत बोस यांच्या मालकीच्या दोन निवासस्थानांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. दमदम नगरपालिकेचे माजी प्रमुख सुबोध चक्रवर्ती यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याच्या संशयावरून ईडीने त्यांच्या घरातही झडती घेण्याची कारवाई हाती घेतली आहे.

Advertisement
Tags :

.