महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गैरहजर, कामात हयगय करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई

01:45 PM Dec 04, 2024 IST | Radhika Patil
Action against officers and employees who are absent and absent from work
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

प्रशासक ट्रेनिंगसाठी गेल्या आहेत, म्हणजे एक महिना हम करेसो कायदा असा कारभार महापालिकेत चालणार नाही. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याप्रमाणेच अचानकपणे कोणत्याही विभागाची तपासणी केली जाईल, तसेच शहराच्या स्वच्छतेबाबतही फिरती करण्यात येईल. कामावर गैरहजर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असा ईशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिकेचे प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी दिला.

Advertisement

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी मंगळवारी दुपारी महापालिकेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने पवडी, नगररचना, मुख्य लेखा, घरफाळा, पाणी पुरवठा, अग्निशमन, वर्कशॉप, केएमटी, पर्यावरण, पंतप्रधान आवास योजना, आरोग्य विभाग व इतर विभागांचा त्यांनी आढावा घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस यांनी नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सेवा-सुविधा देण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे. स्वच्छतेच्या अनुषंगाने मी सकाळी फिरती करणार असून शहर दैनंदिन स्वच्छ ठेऊन चांगल्या दर्जाच्या सुविधा नागरीकांना देण्याच्या सूचना केल्या. दोन दिवसात प्रामुख्याने आरोग्य, पाणी पुरवठा व प्रकल्पांचा सविस्तर आढावा संबंधीत अधिक्रायांसमवेत घेणार असलेचे सांगितले.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त साधना पाटील, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चलावाड, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कामगार अधिकारी राम काटकर, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, एलबीटी अधिक्षक विश्वास कांबळे, ग्रंथपाल रत्नाकर जाधव, सहा.विद्युत अभियंता नारायण पुजारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article