12 वर्षांपासून रस्त्यांवर करतोय गरीबीचा अभिनय
महिन्याला 8 लाखाची होते कमाई
जगभरात लोक पैसे कमाविण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबित असतात. यात अनेकदा हे मार्ग इतके विचित्र असतात की त्यावर विश्वास ठेवणेच अवघड असते. अलिकडेच चीनमधील एक ‘भिकारी’ अशाच कारणामुळे चर्चेत आहे. हा व्यक्ती एक महिन्यात 70 हजार युआन (8 लाख रुपये) कमावतो. हा व्यक्ती केवळ भीक मागून ही रक्कम जमवत असतो. हा व्यक्ती प्रत्यक्षात भिकारी नसून तो एक व्यावसायिक अभिनेता आहे.
मागील 12 वर्षांपासून अभिनेता लू जिंगांग एका लोकप्रिय पर्यटनस्थळावर एका भिकाऱ्याचा अभिनय करतो, त्याचा अभिनय पाहून लोकांना त्याच्यावर दया येते. अशाचप्रकारे लोकांच्या दयेतून पैसे जमवून तो जीवन व्यतित करत आहे. लू जिंगांगला पाहून तो एक गरीब भिकारी असल्याचे वाटते, परंतु तो प्रत्यक्षात अत्यंत प्रतिभावान असून अभिनयामुळे तो खराखुरा भिकारी नसल्याचे कुणीच ओळखू शकत नाही.
स्वत:च्या अस्वच्छ चेहरा, उदास डोळे आणि फाटलेल्या कपड्यांसोबत पर्यटकांना चकविण्यास त्याने प्राविण्य मिळविले आहे. कथितपणे हा अभिनेता दर महिन्याला 8 लाख रुपयांपर्यंत कमावतो, तसेच लोक त्याला चांगले अन्नही पुरवत असतात. चीनमध्ये सरासरी मासिक वेतन सध्या सुमारे 3.33 लाख रुपये आहे, यामुळे लू जिंगांग हा चीनमध्ये तुलनेत अधिक कमाई करणारा व्यक्ती ठरतो. काही लोक त्याला चीनमधील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणू लागले आहेत, परंतु प्रत्यक्षात हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे, कारण तो व्यावसायिक अभिनेता आहे.
कारकीर्दीसाठी ही असाधारण वाट निवडलो कारण मला अभिनय करणे पसंत होते. यात ऑडिशन न देता असे करण्याची संधी मिळाली आहे. माझ्या परिवाराने प्रारंभी पाठिंबा दिला नाही, परंतु माझे उत्पन्न पाहिल्यावर परिवाराचाही देखील पाठिंबा मिळाल्याचे लू यांचे सांगणे आहे. लू आता इंटरनेटवर लोकप्रिय सेलिब्रिटी ठरला आहे. त्याचे कपडे, धूळयुक्त चेहऱ्यावरील उदास भावना आणि त्याच्या याचना लोकांना मदत करण्यास भाग पाडतात.