अॅसिड हल्ल्याच्या पीडितांना अधिक भरपाई मिळावी
07:00 AM Mar 21, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अॅसिड हल्ल्याच्या पीडितांशी संबंधित याचिकेवर केंद्र सरकार आणि 11 राज्यांकडून उत्तर मागविले आहे. अॅसिड हल्ल्याच्या पीडितांना अधिक भरपाई देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि 11 राज्यांना यावर उत्तरादाखल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्देश दिला आहे. सध्या पंतप्रधान राष्ट्रीय दिलासा निधीतून अॅसिड हल्ला पीडितांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article