महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठा मंडळ किणये स्कूलच्या खेळाडूंचे यश

10:26 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /किणये 

Advertisement

सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या किणये विभागीय क्रीडा स्पर्धेत मराठा मंडळ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश मिळविले. सदर स्पर्धेत वैयक्तिक क्रीडा प्रकारात पावनाई डुकरेने 100 मी. व उंच उडीमध्ये  प्रथम, 200 मी. तृतीय क्रमांक, सृष्टी मोरे हिने तिहेरी उडीमध्ये प्रथम व लांब उडीमध्ये द्वितीय, वैभवी पाटीलने उंच उडीमध्ये द्वितीय, अडथळा शर्यतीत तृतीय, रियाणा शेख हिने 61 किलो कुस्ती विभागात द्वितीय, पल्लवी पाटीलने 46 किलो कुस्ती गटात द्वितीय, बुद्धिबळ स्पर्धेत नकुशा पाटील व सविता कोकरेने यांनी विजेतेपद पटकाविले.

Advertisement

मुलांमध्ये लांब उडीत सुजय पाटीलने तृतीय, गोळा फेक प्रकारात बसवंत पाटीलने द्वितीय, कुस्ती प्रकारात सुजल पाटील याने 48 किलो गटात द्वितीय, कुणाल पाटीलने 71 किलो गटात तृतीय, शैलेश पाटीलने 60 किलो गटात प्रथम, पांडुरंग पाटीलने 51 किलो गटात प्रथम, साहिल पाटील  55 किलो वजन गटात प्रथम, अथर्व पाटील 48 किलो गटात दुसरा तर योगासनात आर्यन लोहार, रविकांत देसाई, भगवंत गुरव यांनी विजेतेपद मिळविले. सांघिक स्पर्धेमध्ये हँडबॉल स्पर्धेत मुलांनी उपविजेतेपद, मुलींच्या गटामध्ये योगासनामध्ये विजेतेपद, मुलींचा खो-खो संघाने विजेतेपद व मुलींच्या रिले संघाने विजेतेपद मिळविले. या खेळाडूंना संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू, मुख्याध्यापक एस.एम. वड्डेबैलकर यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक के. आय. हैबत्ती यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article