For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

15 डिसेंबरला आचरा गाव होणार निर्मनुष्य

04:21 PM Dec 02, 2024 IST | अनुजा कुडतरकर
15 डिसेंबरला आचरा गाव होणार निर्मनुष्य
Advertisement

  संपूर्ण गाव जाणार वेशीबाहेर ; वाचा सिंधुदुर्गातील आचरे गावची अनोखी प्रथा 

Advertisement

आचरा |  प्रतिनिधी

दर तीन ते पाच वर्षांनी होणारी संस्थान आचरेची गावपळण या वर्षी श्री देव रामेश्वरच्या हुकुमावरून 15 डिसेंबरला होत आहे.तीन दिवस चालणाऱ्या या गावपळणीत संपूर्ण आचरेवासीय आपल्या कुत्रे,मांजर, गुरे, ढोरे कोंबड्या, यांसह गाव वेशीबाहेर राहणार असल्याने साडे सात हजार लोकसंख्या असलेला आचरे गाव संपूर्ण निर्मनुष्य होणार आहे. याबाबतची माहिती वहिवाटदार मिराशी, देवस्थान सचिव संतोष मिराशी यांनी दिली.

Advertisement

या गावपळणीला हिंदू बरोबर,मुस्लिम, ख्रिश्चन आनंदाने सहभागी होत असल्याने आचरे गावची गावपळण वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. डिसेंबर 2019 साली आचरे गावच्या गावपळणीनंतर यावर्षी गावपळणीचे वर्ष असल्याने मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्री देव रामेश्वराला देव दीपावली दिवशी दुपारी कौल प्रसाद घेण्यात आला. श्री रामेश्वराच्या हुकुमावरून प्रथेप्रमाणे 15 डिसेंबरला संस्थानकालीन आचरेची गावपळण होणार आहे. आचरेवासीय गावाच्या सीमेबाहेर कारीवणे नदी किनारी, चिंदर,त्रिंबक,पोयरे,मुणगे,आडबंदर, वायंगणी,सडेवाडी या भागात ग्रामस्थ राहुट्या उभारून राहणार आहेत.यात सर्वधर्मीय सहभागी होत असल्याने आचरेची गावपळण वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे.आजच्या विस्कळीत जीवनशैलीत गावपळणीनिमित्त तीन दिवस तीन रात्री संपूर्ण आचरे गाव वेशी बाहेर एकत्र नांदणार आहे. आजच्या विज्ञान युगातही ही प्रथा ग्रामस्थ मोठ्या हौशीने शेकडो वर्षे पाळत आली आहेत. तीन दिवस कोणतेही काम नसल्याने संपूर्ण दिवस आनंदात हसत खेळत संगीत, भजने यात आचरे गावची रयत 3 दिवस तीन रात्री रममाण झाल्याचे दृश्य दिसणार आहे

फोटो परेश सावंत (संग्रहीत फोटो)

Advertisement
Tags :

.