महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला पाच वर्षांचा कारावास, दोन लाखांचा दंड

11:59 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : दक्षिण गोव्यातील सहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पणजी येथील बाल न्यायालयाने सहा वर्षांनी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातील आरोपीला 5 वर्षे कारावास आणि 2 लाख ऊपये दंड अशी शिक्षा बाल न्यायालयाचे अध्यक्ष सायोनारा लाड यांनी शुक्रवारी दिली आहे. आरोपीने 17 जून 2018 रोजी पीडित मुलगी घरी एकटी असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी सांगे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तत्कालीन सांगे पोलीस उपनिरीक्षक मनोज मळीक यांनी तक्रारीची दखल घेऊन आरोपीच्या विरोधात भा.दं.सं.च्या कलम 448, बाल कायद्याचे कलम 8 आणि बाल लैंगिक शोषणविरोधी कायदा 2012 च्या (पॉक्सो) 7  कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 48 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली होती. सांगे पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीविरोधात बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सबळ पुरावे असल्यामुळे न्यायालायने आरोपीला 3 मार्च रोजी दोषी ठरवले. त्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी आरोपीला पाच वर्षांचा कारावास आणि 2 लाख ऊपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article