For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पॅरोलवरील आरोपीस ३ दिवसाची पोलीस कोठडी! पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल

01:47 PM Aug 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
पॅरोलवरील आरोपीस ३ दिवसाची पोलीस कोठडी  पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल
Advertisement

परिसरातील नागरिकांकडून गुन्हेगारांच्या घराची मोडतोड : पोलिसांकडून दक्षता

सांगली प्रतिनिधी

शहरातील संजयनगर परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगाराने बलात्कार केला. याप्रकरणी यातील आरोपी संजय प्रकाश माने (वय 34) याला पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर उभे केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपीच्या घराची मोडतोड परिसरातील नागरिकांनी केली आहे. यामुळे पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील महिन्यात या संशयित आरोपीने पडित मुलीस तू मला आवडतेस असे म्हणून तिचा विनयभंग केला होता. त्याबाबत पिडीतेने कुठेही वाच्यता केली नाही. मात्र शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास पिडीता दुकानात खाऊ आणण्यास गेली होती. त्यावेळी संशयिताने तिला बोलावले. जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकीही दिली. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पिडीतेच्या आईने संजयनगर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तातडीने संशियतांस अटक केली आणि रविवारी त्याला न्यायालयासमोर उभे केले न्यायालयाने त्याला तीन दिवसाची कोठडी दिली असल्याची माहिती तपास अधिकारी संजयनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिली. दरम्यान या संतापजनक घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी या गुन्हेगाराच्या घराची मोडतोड केली. त्यामुळे तात्काळ संजयनगर पोलीसांनी या परिसरात बंदोबस्त तैनात करून या परिसरात शांतता निर्माण केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.