For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लैगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षाचा सश्रम कारावास

12:29 PM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
लैगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षाचा सश्रम कारावास
Advertisement

पॉक्सो न्यायालयाचा महत्वपूर्ण निवाडा  

Advertisement

पणजी : एका हॉटेलात कर्मचारी असलेल्या आरोपीने आपल्याच मालकिणीवर लैगिक अत्याचार करुन तिचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मेरशी येथील जलदगती विशेष न्यायालयाच्या (पॉक्सो ) न्या. दुर्गा मडकईकर यांनी आरोपी लालरीनूंगा लल्फाक्जहुआ याला 10 वर्षांचा सश्रम कारावास आणि 1.26 लाख ऊपये दंडाची शिक्षा ठोठावली. बार्देश तालुक्यातील हॉटेलात 2019 साली मालकाच्या पत्नीला एका खोलीत धमकावून लैगिक अत्याचार आणि तोंडावर उशी दाबून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी पॉक्सो न्यायालयात सुनावणीवेळी सरकारी वकिलाने गुन्हा घडतेवेळी आरोपीने तोंडावर बुरखा घातला असला तरी थोडा वेळ बुरखा काढल्याने पीडितेने त्याला ओळखले होते. घटनास्थळी आरोपीचे केस आणि रक्त सापडले असल्याने गुन्हा घडतेवेळी त्याचे अस्तित्व सिद्ध होत असल्याचे सांगितले. पीडितेने आरोपीला प्रत्यक्ष ओळखत नसले तरी त्याचा आवाज तिने ओळखला होता.

पोलिस तपासकामात त्रुटी दाखवताना आरोपीच्या वकिलाने अटक पंचनामा केला नसल्याचे दाखवले. चार ते पाच साक्षीदारांची जबानी घेतली असली तरी ते पिडीतेचे कर्मचारी असल्याने त्यांच्यावर दबाव असण्याची शक्यता व्यक्त केली. आरोपी सफाई कर्मचारी असल्याने त्याचे केस व रक्त खोलीत मिळणे शक्य असल्याने तो पुरावा होऊ शकत नसल्याचा दावा त्यांनी केला होता. दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्यावर न्यायालयाने आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम-342 अंतर्गत 1 वर्षाची साधी कैद  आणि 1हजार ऊपये दंड. दंड न भरल्यास 2 दिवसांची साधी कैद; तसेच कलम 506 अंतर्गत 7 वर्षांचा कारावास आणि 25 हजार ऊपये दंड. दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कैद; बलात्कार प्रकरणी भा.दं.सं. कलम 376 अंतर्गत 10वर्षांचा कारावास आणि 50 हजार ऊपये दंड. दंड न भरल्यास 1 महिन्याची सक्तमजुरी, खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल भा.दं.सं. कलम- 307 अंतर्गत 10 वर्षाची सक्तमजुरी आणि 50 हजार ऊपये दंड ठोठावण्यात आला आहे. आरोपीने 18 डिसेंबर 2019 पासून 5 वर्षे 7 महिने आणि 11 दिवसांचा कालावधी तुऊंगात घालवले असल्याने तेवढ्या सजेचा कालावधी रद्द करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.