महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विसर्जन मिरवणुकीवेळी गणेशभक्ताचा अपघाती मृत्यू

11:40 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कपिलेश्वर उड्डाणपुलावरील घटना, एक जखमी

Advertisement

बेळगाव : विसर्जनासाठी श्रीमूर्ती घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून एका गणेशभक्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला. बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कपिलेश्वर उड्डाणपुलावर ही घटना घडली. गणेशभक्ताच्या अपघाती मृत्युमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदानंद बाळासाहेब चव्हाण-पाटील (वय 48) रा. सुळगे-येळ्ळूर असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी गणेशभक्ताचे नाव आहे. विजय यल्लाप्पा राजगोळकर (वय 56) रा. तेग्गीन गल्ली, वडगाव हा जखमी झाला असून त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Advertisement

वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. घटनेची माहिती समजताच वाहतूक विभागाचे एसीपी पवन एन., दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर उड्डाणपुलावरील वाहतूक काहीकाळ ठप्प होती. घटनेची माहिती समजताच माजी महापौर विजय मोरे, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण-पाटील, विजय जाधव, साईप्रसाद चव्हाण-पाटील, सुनील चव्हाण-पाटील आदींनी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास श्रीमूर्तीचे विसर्जनही करण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार पाटील गल्ली येथील श्रीमूर्तीची विसर्जन मिरवणूक सुरू होती. मंडपापासून थोड्या अंतरावर कपिलेश्वर उड्डाणपुलावर येताच ट्रॅक्टरखाली दोन गणेशभक्त सापडले. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता सदानंद यांचा मृत्यू झाला. सदानंद यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे कुटुंबीय मूळचे पाटील गल्लीचे. गेल्या काही वर्षांपासून सुळगे-येळ्ळूर येथे त्यांचे वास्तव्य आहे. या घटनेची माहिती मुख्य मिरवणूक व विसर्जन तलाव परिसरात समजताच हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article