For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुचाकीवरून पंढरपूरला वारीला जाणाऱ्या तरूणाचा अपघात! पेढे गावावर शोककळा

05:04 PM Jul 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
दुचाकीवरून पंढरपूरला वारीला जाणाऱ्या तरूणाचा अपघात  पेढे गावावर शोककळा
Pandharpur on a bike Pedhe village
Advertisement

चिपळूण पतिनिधी

सांगली जिह्यामधील आटपाडी तालुक्यातील दिघंची जवळ झालेल्या चारचाकी वाहन व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात ािापळूण तालुक्यातील पेढे-मोरेवाडीतील रवींद्र बाळू मोरे (45) याचा जागीच मृत्यू झाला. आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूरला वारीसाठी दाकीवरून जाणाऱया रवाया अपघाती मृत्यो वृत्त कळता गावावर शोककळा पसरली.

Advertisement

रवी हा दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला विठूरायाया दर्शनासाठी दाकीवरून जात असतो. यावेळीही तो येथील पेठमापातील आपल्या सहकाऱयाला घेऊन मंगळवारी सकाळा आपल्या निवासस्थानावरून निघाला. मात्र मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास दिघंची पंढरपूर रस्त्यावर उंबरगाव फाट्याजवळ व्हॅगन-आर व रवाया दाकी समोरासमोर धडक होऊन तो जागीच ठार झाला. त्याया पाठीमागे बसलेल्या सहकाऱयासह कारमधील अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. त्याया अपघाती मृत्यो वृत्त गावात समजता अनेकांना धक्का बसला. नातेवाईकांसह ग्रामस्थ तत्काळ आटपाडीला रवाना झाले. आषाढी वारी रवी कधीही चुकलेली नाही. दरवर्षी तो आपल्या दुचाकीवरून वारीला जाया. घरी आर्थिक परिस्थिती बेती असलेला रवी चिपळूण शहरात सोनारकाम करून आपल्या कुटुंबा उदरनिर्वाह करत होता. आईचा मृत्यु गतवर्षा तर वडिलांचे त्यापूर्वा निधन झाले आहे. त्याया पशात भाऊ, पत्नी, पावी इयत्तेत शिकत असलेला मुलगा, पहिलीमध्ये असलेली मुलगी असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.