For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तळगाव फाट्यावरील अपघातात १ ठार, एक जखमी; दुर्गमानवाड - धामोड रोडवरील घटना

06:04 PM Jun 24, 2024 IST | Abhijeet Khandekar
तळगाव फाट्यावरील अपघातात १ ठार  एक जखमी  दुर्गमानवाड   धामोड रोडवरील घटना
Advertisement

धामोड / वार्ताहर

दुर्गमानवाड - धामोड रोडवर तळगाव पैकी भूगुलकरवाडी ( ता. राधानगरी ) येथील फाट्यावर झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली .मयताचे नाव विष्णू दामोदर मस्कर (वय - ६५ रा. बावेली . ता. गगनबावडा ) असे आहे.

Advertisement

याबाबत राधानगरी पोलिसाकडून समजलेली अधिक माहिती अशी की , बावेली येथील विष्णू दामोदर मस्कर (वय - ६५ )व वासुदेव आबा पाटील ( वय - ६१ रा. बावेली ) हे कामानिमित्त तळगाव येथे आले होते . दुर्गमानवाड - धामोड दरम्यानच्या रोडवर तळगाव पैकी भूगुलकरवडी येथील फाट्यावर त्यांची मोटरसायकल व अभिजीत बाबुराव सांगावकर ( रा. राधानगरी ) यांची चार चाकी गाडी यांच्यामध्ये जोराची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दामोदर मस्कर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला तर वासुदेव आबा पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत .सांगावकर यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे, कृष्णात , खामकर ,कृष्णात यादव करीत आहेत .

Advertisement
Advertisement
Tags :

.