शिराळा बायपास रोडवरील अपघात तरूण जागीच ठार!
शिराळा प्रतिनिधी
शिराळा येथील बायपास रोडवर आयशर ट्रक व मोटारसायकल यांच्यात भीषण झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार प्रथमेश चंद्रकांत साळुंखे (24) रा. निगडी (ता. शिराळा) हा तरूण जागीच ठार झाला. हा अपघात रविवार आठ रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. तर प्रवीण विठ्ठल कडवेकर रा. इंगरूळ (ता. शिराळा) यांने शिराळा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत घटनास्थळावरून व शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी की, रविवारी रात्री हुबालवाडी (ता. वाळवा) येथील आयशर ट्रक (एम. एच. 08 एच. 1517) हा कोकरूडकडून शिराळा बायपासरोडने पेठनाक्याकडे चालला होता. तर मोटारसायकल वरील प्रथमेश साळुंखे हा मोटारसायकलवरून (क्रमांक एच. 10 बी. जे. 2364) शिराळ्याकडून इंगरूळकडे निघाला होता. यावेळी बायपास रोडवर कापरी नाका चौकात आयशर गाडीने मोटारसायकलला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, यामध्ये प्रथमेशची गाडी व तो पुढील चाकाखाली अडकून जवळपास पन्नास फूट फरकटत गेला. यामध्ये मोटारसायकल स्वार प्रथमेश साळुंखे हा जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने गाडी सोडून पलायन केले असून या घटनेचा आ†धक तपास पोलीस हवालदार आर. आर. शेख करत आहेत.