कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Satara : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, विद्यार्थीनी गंभीर जखमी

05:08 PM Nov 17, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                    कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा

Advertisement


एकंबे
: सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर मुगाव फाटा (ता. कोरेगाव) येथे शनिवारी सायंकाळी पांढऱ्या रंगाच्या अज्ञात होंडा सिटी कारने दिलेल्या जोरदार धडकेत १५ वर्षीय अमृता फडतरे ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. तिच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालक कार न थांबवता पळून गेल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे.

Advertisement

याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञातकारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या पोलिसांकडून माहितीनुसार श्रीशांत गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यात नमूद केले आहे की, अमृता फडतरे ही विद्यार्थिनी शनिवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास महामार्ग ओलांडण्यासाठी साईडपट्टीवर उभी होती. सातारा बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या होंडा सिटी कारने तिला जोरात धडक दिली.

त्यामुळे अमृता महामार्गावर फेकली गेली. तिच्या डोक्याला व कानाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत केली. जखमी अवस्थेत अमृताला खासगी वाहनाने कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र प्रकृती गंभीर असल्याने तातडीने सातारा येथील खासगी रुग्णालयात तिला हलविण्यात आले. अपघातानंतर होंडा सिटी कारचालक घटनास्थळी थांबून जखमी विद्यार्थिनीला मदत न करता तसेच कोरेगाव पोलीस ठाण्यातही माहिती न देता फरार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हवालदार अमोल कर्णे तपास करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia15-year-old student injuredEkambe accidentpolice investigationPrivate hospital treatmentRoad safetySatara-Latur highway
Next Article