दापोली - दाभोळ मार्गावर अपघात,एक ठार, एक गंभीर
03:35 PM Aug 23, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
दापोली : दापोली - दाभोळ मार्गावर उंबर्ले येथे दापोलीकडून दाभोळकडे जाणारी एसटी व दाभोळकडून दापोलीकडे येणाऱ्या दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात तैहसीन मथरुजी (वय सु. ३५, रा. वणकर मोहल्ला, दाभोळ) याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेल्या शमशुद्दीन दांडेकर रा. दाभोळ याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला पुढील उपचारासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article